योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका विशिष्ट उद्योगाची योजना तयार करावी लागेल.
या उद्योगाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सरकारला सादर करावा लागेल.
सादर केलेल्या प्रकल्प अहवालाची आणि लखपती दीदी योजनेसाठी केलेल्या अर्जाची सरकारद्वारे कसून पडताळणी केली जाईल.
यासाठी महिला व बालविकास विभागाकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.