Ladki Bahin Yojana April Month Installment : लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत काही महिलांना ३००० रुपये मिळणार आहेत.
या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात मिळणार ३००० रुपये
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिन्याला दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. या योजनेत एप्रिल महिन्यात काही महिलांना ३००० रुपये दिले जाणार आहे.
या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात मिळणार ३००० रुपये
लाडकी बहीण योजनेत काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तांत्रिक कारणांमुळे महिलांचा हप्ता रखडला असू शकतो. ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही. त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जातील. परंतु मार्च महिन्याल सर्व पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत.फक्त थोड्याच महिलांना पैसे मिळाले नसतील. त्यामुळे या महिलांना एप्रिलमध्ये ३००० रुपये देऊ शकतात.
एप्रिलचा हप्ता येणार तरी कधी?
लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) एप्रिलचा हप्ता कधी देणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजेच अक्षय तृतीयेला हे पैसे जमा होऊ शकतात. अक्षय तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
या महिलांना मिळणार नाहीत पैसे
लाडकी बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आली आहे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे. सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.