SBI Digital Loan : आरटीएक्ससी अंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांची पात्रता तपासणे यासह त्यांच्या कागदपत्रांची तपासणी आणि इतर प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल. पगारदार वर्गासाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुंबई : डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील सर्व बँका नवीन उत्पादने बाजारात आणत आहेत. यामुळे ग्राहकांना सुविधा तर मिळत आहेच शिवाय शाखेत जाण्याच्या
त्रासापासूनही त्यांची सुटका होत आहे. देशातील सर्वात मोठी बँक, एसबीआयने अलीकडेच त्यांच्या YONO अॅपवर रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट नावाचे कर्ज उत्पादन लॉन्च केले आहे. रिअल टाईम एक्सप्रेस क्रेडिट नावाच्या या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या ३५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहजपणे घेता येणार आहे.
यासाठी ग्राहकांना शाखेत जाण्याची गरज भासणार नाही आणि घरबसल्या डिजिटल माध्यमातून सर्व कामे होतील. पगारदार वर्गासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. एसबीआयने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की आरटीएक्ससी अंतर्गत वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची पात्रता तपासण्यासह कागदपत्रांची पडताळणी आणि इतर प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होतील. अॅपद्वारे वैयक्तिक कर्ज देण्याची ही सुविधा विशेषतः पगारदार वर्गाला लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांचे पगार खाते एसबीआयमध्ये आहे त्यांना याचा अधिक फायदा होईल.