गाय-म्हैस गोठा बांधण्यासाठी 2 लाख 31 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज
goat farming नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे गाय म्हशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे गाय म्हैस साठी पक्के गोठे बांधण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येणार आहे गाई म्हशी पालनासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत राज्यांमधील शेतकऱ्यांना गाई म्हशींसाठी पक्का गोठा अनुदान दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत होते आणि आर्थिक देखील मदत होते
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही 3 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशी साठी पक्का गोटा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनेतून शेतकऱ्याला गाई म्हशी साठी पक्का गोठा या अनुदानाच्या माध्यमातून मिळतो या योजनेच्या माध्यमातून तुम्ही शेळी पालन कुक्कुटपलन आणि पशुपालन या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून तुम्ही करू शकता महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये या योजनेच्या माध्यमातून डेरी फार्म देखील राबविला जातो
या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून गाई म्हशी गोठा बांधल्यामुळे गाई म्हशीचे आरोग्य चांगले राहते आणि त्याचबरोबर गाई म्हशीच्या दूध उत्पन्नामध्ये देखील वाढ होते गाई म्हशीचे पालन करणे सोपे होते योजनेमुळे गोटा बांधण्यासाठी शेतकऱ्याचा खर्च कमी होतो या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक बोजा देखील कमी होतो
असा करा अर्ज
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला या योजनेचा अर्ज करावा लागेल या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय मार्फत पंचायत समिती कार्याकडे गोट्यासाठी अर्ज सादर करावा लागेल दुसरी पद्धत म्हणजे तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पशुधन विभाग यांच्या माध्यमातून देखील अर्ज करता येतो
गोठा योजना फायदा
या योजनेमुळे गाई म्हशी पाळण्यासाठी आणि योग्य रित्या संगोपन करता यावे आणि दुसरा प्राण्यांपासून यांचे रक्षण व्हावे यासाठी गोठा योजना राबवली जाते
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक पशुधन असल्याचा पुरावा स्वतःच्या जागेचे मालकी हक्क सिद्ध करणारे कागदपत्र
या योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळते
या योजनेतून दोन ते सहा जनावराचा गोठा बांधण्यासाठी एकूण जवळपास 77 हजार एवढे अनुदान सरकारकडून दिले जाते
सहा ते बारा जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी जवळपास 1 लाख 54 हजार रुपये अनुदान दिले जाते
आणि तेरा पेक्षा जास्त जनावरे असलेल्या गोठ्याला जवळपास दोन लाख 31 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते अशाप्रकारे ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला गोठा बांधण्यासाठी मदत मिळते
या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार
अर्ज सादर करताना शेतकरी असणे आवश्यक आहे या योजनेसाठी स्वतःची जागा असणे आवश्यक आहे याशिवाय गाय म्हशी पाळण्याचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे अशा प्रकारे या योजनेचा लाभ मिळणार आहे